महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Corona Update : लाट सुरूच 24 तासांत भारतात कोरोनाचे 3.47 लाख रुग्ण, 703 मृत्यू - भारतात कोरोनाचे 3.47 लाख रुग्ण,

भारतात कोरोना रुग्णांमध्ये आणखी वाढ (increase in corona patients) नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत 3.47 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ही वाढ कालच्या नोंदी पेक्षा 29 हजार 722 ने जास्त आहे. दरम्यान कोरोना बाधित 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येनेही 20 लाखाचा टप्पा ओलांडला आहे.

Corona Update
Corona Update

By

Published : Jan 21, 2022, 10:07 AM IST

नवी दिल्ली: भारतात कोरोनाच्या रुग्ण संख्येमधे आणखी वाढ (increase in corona patients) नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत 3.47 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे कालच्या तुलनेत हा आकडा 29 हजार 722 ने जास्त आहे . यादरम्यान कोरोना ग्रस्त 703 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 18 हजार 825 तर मृतांची संख्या 4 लाख 88 हजार 396 झाली आहे. ओंमायक्राॅनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 हजाराच्या जवळ पोचली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीचा दुसरा डोस राहिलेल्या 6.5 कोटी भारतीयांनी लस घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. लसींमुळेच तिसऱ्या लाटेत मृत्यूदरात लक्षणीय घट झाल्याचे म्हणले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details