महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी; कोविडच्या नियमांचे उल्लंघन - बदायूं धर्मगुरू निधन

रविवारी बदायूंमधील मुस्लिम धर्मगुरू अब्दुल हमीद मोहम्मद सलिमुल कादरी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी कोविडच्या नियमांचे उल्लंघन करत शेकडो लोक हजर होते. त्यामुळे कलम १८८ आणि इतर संबंधित कलमांतर्गत याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बदायूंचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी दिली.

COVID norms flouted as thousand attend UP Cleric's funeral in Badaun
मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी; कोविडच्या नियमांचे उल्लंघन

By

Published : May 11, 2021, 6:58 AM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये एका मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यविधीला शेकडो लोकांनी गर्दी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात निर्बंध लागू करण्यात आले असूनही, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी; कोविडच्या नियमांचे उल्लंघन

रविवारी बदायूंमधील मुस्लिम धर्मगुरू अब्दुल हमीद मोहम्मद सलिमुल कादरी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी कोविडच्या नियमांचे उल्लंघन करत शेकडो लोक हजर होते. त्यामुळे कलम १८८ आणि इतर संबंधित कलमांतर्गत याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बदायूंचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी दिली.

उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, यामधील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांना परवानगी दिली आहे.

हेही वाचा :'मोदी सरकारने महामारीकडे दुर्लक्ष केल्याने भारताला भयानक किंमत मोजावी लागतीयं'

ABOUT THE AUTHOR

...view details