मुंबई - देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. 13 जानेवारी) गुरुवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. (PM Modi Meeting Chief Minister) हा संवाद दुपारी 4:30 वाजता होणार (Corona Situation In India) असून तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत.
पायाभूत सुविधांची खात्री करण्याच्या गरजेवर भर
पंतप्रधानांनी 9 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका बैठक घेतली होती. त्या आढावा बैठकीदरम्यान, मोदींनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला होता. त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत राज्यांशी समन्वय राखण्यास सांगितले होते.
साथीच्या रोगाचा प्रसार किंवा विस्तार होण्यास जास्त वेळ लागतो
याआधी बुधवारी (12 जानेवारी) ला नीती आयोगाचे सदस्य, डॉ. व्हीके पॉल (Dr. VK Paul NITI Aayog Member) यांनीही नागरिकांना सावध केले आहे. (Corona patient population in India) कोरोना व्हायरसच्या या ओमिक्रॉन प्रकारामुळे होणारा संसर्ग सामान्य सर्दी मानला जाऊ नये. तसेच, लोकांनी त्याला हलके समजू नेये असही ते म्हणाले आहेत. ओमिक्रॉन कोविड-19 चे डेल्टा व्हेरियंटचे लक्षण बदलत आहेत. कारण ते जास्त प्रमाणात संक्रमित होत आहेत. याला सामान्य सर्दी समजू नये. साधारणपणे, साथीच्या रोगाचा प्रसार किंवा विस्तार होण्यास जास्त वेळ लागतो. परंतु, यावेळी ते खूप जलद गतीने पसरत आहे. असही पॉल म्हणाले आहेत.