महाराष्ट्र

maharashtra

'कोरोनावरील लस सुरक्षित असून नागरिकांनी संकोच बाळगू नये'

By

Published : Jan 2, 2021, 5:06 PM IST

मी प्रत्येकाला विश्वास देतो की, कोरोना लस सुरक्षितच आहे. लसीने सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पार केल्या असून तिचे कोणतेही गंभीर परिणाम नाहीत. लोकांनी लस घेण्यात कोणताही संकोच बागळू नये, असे डॉ. मांडे यांनी म्हटले आहे.

डॉ. शेखर मांडे
डॉ. शेखर मांडे

नवी दिल्ली - कोरोना लसीकरण भारतात येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. अनेक कंपन्यांच्या लसी बाजारात आल्या असून भारत सरकारने नुकतेच सीरम कंपनीच्या 'कोविशिल्ड' लसीला परवानगी दिली आहे. कोणती लस किती प्रभावशाली किंवा कार्यक्षम आहे, याबाबत कंपन्यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. त्यामुळे लस घेण्याबाबत नागरिकांत संकोच असू शकतो. दरम्यान, कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अ‌ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी देशातील जनतेला आश्वस्त केले आहे.

'कोरोना लस सुरक्षितच'

मी प्रत्येकाला विश्वास देतो की, कोरोना लस सुरक्षितच आहे. लसीने सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पार केल्या असून तिचे कोणतेही गंभीर परिणाम नाहीत. लोकांनी लस घेण्यात कोणताही संकोच बागळू नये, असे डॉ. मांडे यांनी म्हटले आहे.

देशातील चार राज्यात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेण्यात येत आहे. लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी झाला, असे जर देशाचे आरोग्य मंत्री म्हणत असतील तर नक्कीच ड्राय रन यशस्वी झाले. लसीकरणासाठी भारत प्रगतीपथावर आहे. भारतातील कोरोना लसीकरण सार्वत्रिक निवडणुकीसारखे असल्याचे डॉ. मांडे म्हणाले. नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी तयारी अती महत्त्वाची आहे. लस दिल्यानंतर नागरिकांवर निगराणी ठेवाली लागेल, असे मांडे म्हणाले.

आजपासून भारतात लसीचा ड्राय रन

देशात कोरोनाचा प्रसार झाला असून त्याला आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशाचे लक्ष कोरोना व्हॅक्सीनकडे लागले आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशामध्ये ड्राय रन सुरू करण्यासाठी सरकार तयारीला लागेल आहे. ऐन लसीकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, त्यांचे आधीच निरसरन करण्यासाठी ड्राय रन म्हणजेच लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येत आहे. ड्राय रन संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 31 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये आरोग्य मंत्रालायचे प्रमुख सचिव आणि राज्य, केंद्रशासित प्रदशांचे आरोग्य अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details