महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात 4 लाख 79 हजार रुग्ण सक्रिय; रिकव्हरी रेट 93.09 वर - कोरोना अपडेट

देशात आतापर्यंत 12 कोटी 48 लाख 36 हजार 819 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 41 हजार 100 रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 88 लाख 14 हजार 579 वर पोहचली आहे. तसेच 4 लाख 79 हजार 216 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Nov 15, 2020, 4:47 PM IST

नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार होत असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 41 हजार 100 रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 88 लाख 14 हजार 579 वर पोहचली आहे. यात 1 लाख 29 हजार 635 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 82 लाख 5 हजार 728 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू दर 1.47 टक्के तर रिकव्हरी रेट 93.09 वर पोहचला आहे. तर 4 लाख 79 हजार 216 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

देशात आतापर्यंत 12 कोटी 48 लाख 36 हजार 819 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. तर शनिवारी 8 लाख 5 हजार 589 चाचण्या दिवसभरात झाल्या आहेत. देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर फक्त एकच प्रयोगशाळा होती. मात्र, आता सरकारी 1 हजार 146 आणि खासगी 945 अशा एकूण 2 हजार 91 प्रयोगशाळा आहेत.

लवकरच लस येणार -

देशात 'आत्मनिर्भर भारत' पॅकेजची घोषणा करताना कोरोना लस संशोधनासाठी स्वतंत्रपणे 900 कोटी रुपयांच्या तरतूद करण्यात आली आहे. सिरम आणि आयसीएमआर या दोन्ही संस्था संयुक्तपणे कोरोनावरील लसीच्या वैद्यकीय चाचण्या देशात घेणार आहेत. औषध कंपनी फायझरने कोरोनावरील लस ही परिणामकारक असल्याचा दावा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details