महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात नव्या 43 हजार रुग्णांची नोंद, तर 36 कोटींपेक्षा जास्त जणांचे लसीकरण - कोरोना अपडेट

गेल्या 24 तासांत 43,393 नोंद झाली आहे. तर 44,459 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 911 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.

India reports 43K cases
कोरोना अपडेट

By

Published : Jul 9, 2021, 10:40 AM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट असून दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 43,393 नोंद झाली आहे. तर 44,459 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 911 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.

देशात एकूण 2 कोटी 98 लाखांहून अधिक नागरिक आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात आता 4,58,727 नागरिकांवर उपचार सुरू आहे. तसेच देशात विक्रमी कोरोना चाचण्या होत आहेत. बुधवारी 17,90,708 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 42,70,16,605 चाचण्या पार पडल्या आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...

एकूण रुग्ण : 3,07,52,950

कोरोनामुक्त रुग्ण : 2,98,88,284

सक्रीय रुग्ण संख्या : 4,58,727

एकूण मृत्यू : 4,05,939

एकूण लसीकरण : 36,89,91,222

36 कोटींपेक्षा जास्त जणांचे लसीकरण -

देशातील कोरोना मृत्यूदर 1.32 टक्क्यांवर पोहोचला असून रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून जास्त आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचं प्रमाण 1.49 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. तर गुरवारी भारतात कोविड लसीचे 40,23,173 डोस टोचवण्यात आले. तर आतापर्यंत 36,89,91,222 जणांचे लसीकरण झाले आहे.

केरळमध्ये आढळला झिका विषाणू -

कोरोनाच्या संकटातून जाणाऱ्या केरळला आणखी नवीन संकटाला सामोरे जावे लागणार आहे. झिका हा विषाणुजन्य रोग केरळमध्ये आढळला आहे. पारसाला येथील 24 वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे. तिरुवनंतपुरम जिल्ह्यात आणखी 13 जणांना झिकाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पुण्याच्या प्रयोगशाळेकडून अद्याप पुष्टी मिळाली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details