महाराष्ट्र

maharashtra

नव्या 3 लाख कोरोना रुग्णांची नोंद; तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू

By

Published : May 14, 2021, 3:38 PM IST

गेल्या 24 तासांमध्ये देशात 3 लाख 43 हजार 144 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. यात एक दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 44 हजार 776 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 3 लाख 43 हजार 144 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. यात एक दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 44 हजार 776 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 कोटी 40 लाख 46 हजार 809 एवढी झाली आहे. तर यात 2 कोटी 79 हजार 599 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 2 लाख 62 हजार 317 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या देशातील विविध रुग्णालयात 37 लाख 4 हजार 893 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 17 कोटी 92 लाख 98 हजार 584 नागरिकांना लस टोचवण्यात आली आहे.

देशात लसीची कमतरता -

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात ऑक्सफर्ड-अ‌ॅस्त्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीच्या 'कोव्हॅक्सिन' लसीचे लसीकरण सुरू आहे. देशातील लसींची कमतरता आणि वाढती मागणी यात दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह अनेक राज्यांनी लस पुरवठ्यासाठी जागतिक निविदा मागविण्याचे ठरविले आहे. तसेच देशात आता रशियाच्या स्पुटनिक-५ लसीला देशात वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. 'स्पुटनिक-५' लसीची किंमत ९९५ रुपये प्रतिडोस अशी आहे. भारतात या लसीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर किंमती कमी होणार असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे.

स्मशनात जागा नाही -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचे बळी जात आहेत. ही संख्या एवढी आहे, की स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही शिल्लक राहत नाही. गंगेकिनारी वाळूतच मृतदेहांना दफन करत अंत्यविधी पार पाडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर उत्तर प्रदेशमधील बल्लिया जिल्ह्यातील नरहरी ठाण्याजवळ सुहाव ब्लॉक अंतर्गत 60 जवळी डेरा गंगा घाटजवळ जवळपास 12 मृतदेह आढळले आहेत. शहरातून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनारी जवळपास ५० लोकांचे मृतदेह वाहून आल्याचे आढळून आले होते. यांपैकी कित्येक मृतदेहांचे भटक्या कुत्र्यांनी लचकेही तोडल्याचे दिसून आले.

हेही वाचा -'स्पुटनिक-५' लसीची किंमत ९९५ रुपये प्रतिडोस; रेड्डी लॅब्सची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details