महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाची दुसरी लाट संपेना; 24 तासात आढळले नवे 46,164 रुग्ण - भारत कोरोना मृत्यू दर

केंद्राकडून राज्यासह केंद्रशासित प्रदेशांना आणखी 1.03 कोटी लशींचे डोस पुरविण्याचे काम सुरू आहे. राज्यांसह केंद्राकडे वापरात नसलेल्या 3.77 कोटी लशी शिल्लक आहेत.

COVID 19 India update
COVID 19 India update

By

Published : Aug 26, 2021, 5:06 PM IST

हैदराबाद - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नाही. एका दिवसात कोरोनाचे 46,164 रुग्ण आढळले आहेत. तर 607 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीतून दिसून आले. देशात आजतागायत 4,36,365 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात आजपर्यंत एकूण 3,25,58,530 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) 25 ऑगस्टपर्यंत एकूण 51,31,29,378 नमुने कोरोना तपासणीसाठी घेतले होते. तर 17,87,283 नमुने बुधवारी तपासणीसाठी घेतले होते. कोरोना लसीकरण मोहिमेतून देशभरात 60.38 कोटी जणांना लस देण्याचे प्रशासकीय नियोजन करण्यात आले.

हेही वाचा-लग्नानंतर नवरी स्वतःच गाडी चालवत पोहोचली सासरी, व्हिडिओ होतोय व्हायरल

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्यांसह लशींची पुरेशी उपलब्धता

  • देशामध्ये कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले आहे. राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांकडील लशींची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना लशींच्या पुरवठा साखळीचे चांगले नियोजन करता येणार आहे.
  • केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या वैश्वीकरणाच्या मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकारकडून लस उत्पादक कंपन्यांकडून 75 टक्के लस खरेदी करण्यात येत आहे.
  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्यासह केंद्र शासित प्रदेशांना 58.76 कोटीहून अधिक लशींचे डोस पुरविण्यात आले आहेत.
  • केंद्राकडून राज्यासह केंद्रशासित प्रदेशांना आणखी 1.03 कोटी लशींचे डोस पुरविण्याचे काम सुरू आहे. राज्यांसह केंद्राकडे वापरात नसलेल्या 3.77 कोटी लशी शिल्लक आहेत.

हेही वाचा-कॉलेजियम शिफारशीतील तीन महिलांसह 9 न्यायाधीशांच्या बढत्यांना केंद्राकडून हिरवा कंदील

ABOUT THE AUTHOR

...view details