महाराष्ट्र

maharashtra

कोरोना संक्रमणाचा वेग वाढला, देशात २४ तासांत १४ हजार रुग्ण

By

Published : Feb 21, 2021, 2:43 PM IST

देशातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ५६ हजार ३०२ झाला आहे. दररोज सकाळी आठ वाजता ही आकडेवारी सुधारित करण्यात येते. २९ जानेवारीला देशात १८ हजार ८५५ नवे रुग्ण आढळून आले होते. देशातील एकूण बाधितांपैकी १ कोटी ६ लाख ८९ हजार ७१५ व्यक्ती उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.

कोरोना
कोरोना

नवी दिल्ली - देशात कोरोना संक्रमणाने पुन्हा वेग धरला आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्या रोडावली होती. मात्र, आता पुन्हा प्रसार वाढला आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून मागील २४ तासांत देशात १४ हजार २६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णांचा आकडा १ कोटी ९ लाख ९१ हजार ६५१ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात १ लाख ४५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण -

देशातील एकूण मृतांचा आकडा १ लाख ५६ हजार ३०२ झाला आहे. दररोज सकाळी आठ वाजता ही आकडेवारी सुधारीत करण्यात येते. २९ जानेवारीला देशात १८ हजार ८५५ नवे रुग्ण आढळून आले होते. देशातील एकूण बाधितांपैकी १ कोटी ६ लाख ८९ हजार ७१५ व्यक्ती उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. सध्य स्थितीत देशात १ लाख ४५ हजार ६३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या १.३२ टक्के अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव -

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने पुन्हा वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या आठवड्यात राज्यात आता दररोज ३ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये विदर्भातील अमरावती, अकोला यवतमाळ, वर्धा या ठिकाणची संख्या लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी सुरू झालेल्या कोरोना महामारीचा कहर अद्यापही आटोक्यात आलेला नाही. राज्यात जानेवारीपर्यंत आटोक्यात आलेला कोरोना विषाणू पुन्हा वेगाने पसरू लागला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही सुरू आहे. मात्र, त्या तुलनेत कोरोना बाधितांचे प्रमाणदेखील वाढू लागल्याने चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. शनिवारी राज्यात 6 हजार 281 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संक्रमण वाढत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यात अमरावती, वर्धा आणि अकोलामध्ये रुग्णसंख्येचा आकडा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details