महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोविड-१९: ऑटोमेशन आणि रोजगारांचा ऱ्हास

देशात कित्येक दशकांपासून ऑटोमेशन आहे. स्वर्गीय बी आर चोपडा यांनी आपल्या 'नया दौर' चित्रपटात ऑटोमेशनमुळे कामगारांचे रोजगार कसे हिरावून घेतले जात आहेत, हे दाखवले होते. प्रमुख भूमिका करणारे कलावंत दिलीपकुमार यांनी त्यात टांगेवाल्याची भूमिका केली होती. टांग्याला पर्यायी वाहतुकीचे साधन म्हणून जमिनदाराचा मुलगा बस सेवा सुरू करतो. त्यानंतर, चित्रपटाचा नायक म्हणून दिलीपकुमार लढण्याची जिद्द दाखवून यंत्रे, गॅजेट्स आणि तंत्रज्ञानाबरोबर काम करण्यासाठी सक्षम होतो. सध्याची कोविड महामारी आणि रोजगारांचा झालेला ऱ्हास याबाबत हा विशेष लेख....

automation
ऑटोमेशन

By

Published : Dec 19, 2020, 1:20 PM IST

Updated : Dec 21, 2020, 1:23 PM IST

हैदराबाद - आता सध्याच्या सुरू असलेल्या कोविड महामारीमुळे, ऑटोमेशन कोविड पूर्वीच्या दिवसांपेक्षा अधिक वेगाने होत आहे. आपल्याला माहित आहे की, कोरोना संकटामुळे, जगभरात अनेक लोकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. तसेच, त्याला जोडून आणखी ऑटोमेशनमुळे आणखी कित्येक रोजगार गेले आहेत आणि व्यापक प्रमाणावर लोकांच्या नोकऱया गेल्या आहेत. याव्यतिरिक्त, विशेषतः वाहनांचे भाग जोडण्याच्या क्षेत्रात रोबोंचा वाढता वापर केला जात असल्याने वाहन निर्मिती प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्गात घट झाली आहे. या व्यतिरिक्त, रेस्टॉंरंट्स मालक कामगारांवरील खर्चात बचत करण्यासाठी मानवी सेवकांच्या जागी नवीन वेटर म्हणून वाढत्या संख्येने रोबो विकत घेण्यावर पैसा खर्च करत आहेत. काही शाळाही विज्ञान आणि गणितासारखे विषय शिकवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची ट्युटोरियल्स हाताळण्यासाठी रोबोंची सेवा घेण्याचा विचार करत आहेत.

त्याचप्रमाणे, वित्तीय दलाली, वित्तीय संशोधन, वित्तीय बाजारपेठा, विमा कंपन्या याही रोबो आर्थिक सल्लागारांमध्ये गुंतवणूक करत आहेत. या व्यतिरिक्त, रोबो, चॅटबोट्सा चोवीस तास आपल्या ग्राहकांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा पुरवण्यासाठी ऑटोमेशनचा वापर केला जात आहे. ब्लूमबर्गकडे चॅटबोट आहे जे चोविस तास ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम करते. इतरही अनेक कंपन्या ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी चॅटबोट्समध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळे इतर कंपन्यांनाही ऑटोमेशनमध्ये गुंतवणूक करावी, असे वाटू लागले आहे. वाढते ऑटोमेशनचा हे सुरूवातीच्या टप्प्यात मानवी भांडवलाला धोका ठरू शकतो, परंतु दिर्घकालात, ते नवीन रोजगारांच्या संधींची निर्मितीही करते. जर आपल्याला लक्षात असेल तर, जेव्हा देशात संगणक आले, तेव्हा संप करण्यात आले होते, संगणक आणि तंत्रज्ञानाच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. आता आम्ही प्रत्येक ठिकाणी संगणक असल्याचे पहातो.

त्याचप्रमाणे, जेव्हा सेलफोन आणि स्मार्टफोन्स देशात प्रथम आले, तेव्हाही याच प्रकारची भीती काही संघटनांना वाटत होती. परंतु देशाच्या कानाकोपर्यात मोबाईल फोन्स आता दिसतो. आता अनेक कंपन्या कोरोना आणि इतर महामारीपासून संरक्षण करण्यासाठी रोजच्या व्यवसायांमध्येही मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा विचार करू लागल्या आहेत. त्याचवेळेला, ऑटोमेशन आधारित व्यावसायिक मॉडेल्स व्यवसायाची प्रचंड वाढ घडवू शकतात. ऑटोमेशचा कामगारवर्गाला गंभीर स्वरूपाचा धोका असला तरीही एखाद्याला यंत्रापासून स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपली बुद्धिमत्तेत आणि कौशल्यात सुधारणा घडवून आणण्याची संधीही आहे. कारण त्यामुळे जगभरात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतात. याहीपुढे, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन हे ही देशात ऑटोमेशनला झपाट्याने रेटा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनच्या जगात मनुष्यबळाचा विकास करून तयार करण्याचे युग आहे, असे जाहीर केले आहे. कंपन्यांचा असा विश्वास आहे की, ऑटोमेशन कंपन्यांची बचत करून उत्पन्नात वाढ करण्यास कारण ठरते. त्याअनुषंगाने, कॉर्पोरेट कंपन्यांचा असा विश्वास असतो की, ऑटोमेशन पुरवठा साखळीची सुरक्षितताही पुरवते.

व्यवसायांमध्ये रोबोंचा उपयोग करण्याच्या बाबतीत, रोबो कोरोना विषाणु धारण करण्याची जोखिम फारच कमी असते. आरोग्य, बँकिंग आणि वित्तीय सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये, रोबोंचा उपयोग दिवसेंदिवस वाढतच आहे. पैशांनी समृद्ध रूग्णालयेही ऑटोमेशन आणि रोबोटिक तंत्रज्ञानामध्ये रोंबोंचा एकेरी संपर्काचा बिंदू म्हणून गुंतवणूक करत आहेत.त्याचप्रमाणे, आघाडीवरच्या खासगी बँकांनी मानवसदृष्य रोबोचा बँकेच्या शाखेत स्वागतक म्हणून वापर करण्यास सुरूवात केली आहे. तर बंगळुरू स्थित आंतरराष्ट्रीय शाळेने मानवसदृष्य रोबो शिक्षक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भूगोल असे किचकट विषय शिकवण्यासाठी विकसित केला आहे.

जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये सर्वोच्च दहा रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार हे तंत्रचालित असतील जसे की डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन, फिनटेक. ऑटोमेशन आणि आयओटी. अशा प्रकारे, तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन व्यावसायिकांना येत्या काही वर्षात वाढती मागणी असेल.व्यवस्थापकीय कार्य कोणतेही करत असले तरीही व्यवस्थापकीय मध्यस्थाची भूमिका निभावणार्या व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी मागणी कमी होत जाणार आहे. ऑटोमेशन हे आमच्या बहुतेक सारे मध्यस्थ स्वरूपाच्या कामांची उचलबांगडी करणार आहे. त्यामुळे यापुढे मनुष्यबळाने रोबो आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपली कौशल्ये अद्ययावत करणे आवश्यक आहे.

- एम. चंद्रशेखर, सहाय्यक प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एंटरप्राईज, हैदराबाद

(m.chandrashekar@ipeindia.org)

Last Updated : Dec 21, 2020, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details