महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Covid 19 alert दिल्ली आणि मुंबईतील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळला आरएनए व्हायरस - मांडवीय - कोविड १९ अलर्ट

Covid 19 alert: दिल्ली आणि मुंबईतील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आरएनए व्हायरस आढळला RNA virus found in sewage samples असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्री मांडवीय Union Health Minister Mandaviya त्यांनी दिली. तसेच लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करा, गर्दीच्या ठिकाणे टाळा आणि कोविडचे योग्य वर्तन करा, असे निर्देशही त्यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

Union Health Minister Mandaviya
केंद्रिय आरोग्य मंत्री मांडवीय

By

Published : Dec 24, 2022, 7:02 PM IST

नवी दिल्ली - Covid19 चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आम्ही अलर्ट मोडवर काम करत आहोत, असे केंद्रिय आरोग्य मंत्री मांडवीय Union Health Minister Mandaviya यांनी स्पष्ट केले (Covid 19 alert). त्याचवेळी दिल्ली आणि मुंबईतील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आरएनए व्हायरस आढळला RNA virus found in sewage samples असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करा, गर्दीच्या ठिकाणे टाळा आणि कोविडचे योग्य वर्तन करा, असे निर्देशही त्यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.

चीनमध्ये कोरोना स्फोटानंतर आता भारतही कठोर पावले उचलण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी शनिवारी मोठे वक्तव्य केले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, 'चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल. या देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोविड-19 ची लक्षणे आढळून आल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल.

गेल्या २४ तासांत समोर आलेले कोरोना विषाणूचे नवीन रुग्ण आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. भारतात, कोरोना विषाणूच्या संसर्गाची 201 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे एकूण संख्या 4.46 कोटी (4,46,76,879) झाली, तर सक्रिय प्रकरणे 3397 झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details