महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुड न्यूज! गेल्या 24 तासात 18 हजार 732 कोरोना रुग्णांची नोंद - कोरोना रुग्ण संख्या

देशात आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 87 हजार 850 कोरोना रुग्ण आढळली आहेत. तर 1 लाख 47 हजार 622 बळी गेले आहेत. तर देशातील विविध रुग्णांलयामध्ये 2 लाख 78 हजार 690 जणांवर उपचार सुरू आहेत. याचबरोबर आतापर्यंत उपचारानंतर 97 लाख 61 हजार 538 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Dec 27, 2020, 1:15 PM IST

नवी दिल्ली - गेल्या मार्चपासून देशात कोरोनाने थैमान घातलं होतं. युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला असला. तरी भारतामध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येतील वाढ कमी होताना दिसून येत आहे. सुरवातील दिवसाला 50 ते 60 हजार नव्या रुग्णांची भर पडत होती. मात्र, कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे. देशात मागील 24 तासात 18 हजार 732 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 279 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 87 हजार 850 कोरोना रुग्ण आढळली आहेत. तर 1 लाख 47 हजार 622 बळी गेले आहेत. तर देशातील विविध रुग्णांलयामध्ये 2 लाख 78 हजार 690 जणांवर उपचार सुरू आहेत. याचबरोबर आतापर्यंत उपचारानंतर 97 लाख 61 हजार 538 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना चाचण्यांचा आकडा -

राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 63 हजार 927 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 59 हजार 223 रुग्ण महाराष्ट्रात सक्रिय आहेत. शनिवारी दिवसभरात 9 लाख 43 हजार 368 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 16 कोटी 81 लाख 2 हजार 657 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.

रुग्णांचा वाढता क्रम -

कोरोना रुग्णांनी 7 ऑगस्टला 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोंबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाखाचा टप्पा पार केला. तर 19 डिसेंबरला एक कोटीचा टप्पा ओलांडला.

हेही वाचा -'मन की बात' : आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर

ABOUT THE AUTHOR

...view details