नवी दिल्ली:ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकची कोविड लस कोवॅक्सिनला 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. आता देशातील 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस घेता येणार ( Corona Vaccine For Children ) आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, DCGI ने 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी अँटी-कोविड-19 लस 'Corbex' आणि 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 'कोव्हॅक्सीन' लस वापरण्यास परवानगी दिली आहे.