नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. कोव्हॅक्सिन लस ही ब्रिटन आणि भारतामध्ये आढळलेल्या कोरोनाच्या स्टेनवर प्रभावी सिद्ध झाल्याचे भारत बायोटेकने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या सर्व स्ट्रेनविरोधात अँटिबॉडीज तयार करते. भारतात पसरलेल्या B.1.167 या कोरोनाच्या स्ट्रेनवर प्रभावी सिद्ध झाली आहे. तर ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोनाचा B.1.1.7 स्ट्रेनवरही यशस्वी ठरली आहे.
वैज्ञानिक संशोधनाच्या आधारावर कोव्हॅक्सिनला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. ही लस सर्व प्रकारच्या कोरोना प्रकारांविरूद्ध प्रभावी आहे. यामुळे आपली विश्वासार्हता आणखी वाढल्याचे भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि सह-व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इल्ला यांनी सांगितले.
भारतातील कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. B.1.617 हा कोरोनाचा स्ट्रेन भारतामध्ये पसरला आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही लस संरक्षण देते, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था (आयसीएमआर) यांच्या सहकार्याने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.