कोझिकोड : कन्नड भाषेतील एका चित्रपटसंदर्भातील गाण्यावर बंदी घालण्याचे न्यायलयाने आदेश दिले आहेत. कोझिकोड जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने (Kozhikode District Principal Sessions Court )कन्नड हिट चित्रपट 'कांतारा'मधील 'वराहररूपा' गाण्याच्या प्रसारणाला स्थगिती ( stayed the telecast of Varaharoopa song ) दिली आहे. प्रसिद्ध मल्याळम रॉक बँड 'थैकुदम ब्रिज'ने ( Malayalam rock band Thaikudam Bridge )दाखल केलेल्या याचिकेवर विचार करताना, न्यायालयाने निर्माता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक यांना परवानगीशिवाय गाणे प्रदर्शित न करण्याचे निर्देश दिले.
Stay on Varaharoopa song telecast :कन्नड हिट चित्रपट 'कांतारा'मधील वराहरूपा गाण्याच्या प्रसारणावर बंदी, न्यायलायाचे आदेश - न्यायलायाचे आदेश
कन्नड भाषेतील एका चित्रपटसंदर्भातील गाण्यावर बंदी घालण्याचे न्यायलयाने आदेश दिले आहेत. कोझिकोड जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने कन्नड हिट चित्रपट 'कांतारा'मधील 'वराहररूपा' गाण्याच्या प्रसारणाला स्थगिती ( stayed the telecast of 'Varaharoopa' song ) दिली आहे. प्रसिद्ध मल्याळम रॉक बँड 'थैकुदम ब्रिज'ने ( Malayalam rock band ' Thaikudam Bridge' )दाखल केलेल्या याचिकेवर विचार करताना, न्यायालयाने निर्माता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक यांना परवानगीशिवाय गाणे प्रदर्शित न करण्याचे निर्देश दिले.
मूळ संगीताची नक्कल केल्याचा आरोप - चित्रपट निर्मात्यांनी बँडच्या मूळ संगीताची नक्कल केल्याचा आरोप करत थैकुडम ब्रिजने या गाण्यावर स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. बँडने आरोप केला होता की 'वराहरूपा' हे गाणे त्यांच्या मूळ रचना 'नवरसा' ची प्रत आहे जी त्यांनी 2015 मध्ये रिलीज केली होती.
या प्लॅटफॉर्मवरही टेलिकास्ट न करण्याचे आदेश -न्यायलयात प्रसिद्ध मल्याळम रॉक बँड 'थैकुदम ब्रिज'ने दाखल केलेल्या याचिकेचा विचार करून हा निकाल दिला आहे. तसेच अॅमेझॉन प्राइम, युट्युब आणि लिंक म्युझिकला हे गाणे टेलिकास्ट न करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत.