महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Yeddyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश - Court order to file FIR against Karnataka

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर विशेष न्यायालयाने बुधवारी (दि. 14 सप्टेंबर)रोजी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा

By

Published : Sep 14, 2022, 10:35 PM IST

Updated : Sep 14, 2022, 10:56 PM IST

बेंगळुरू -भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यासह खासदारांवरील खटल्यांमध्ये विशेष न्यायालयाने बुधवारी (दि. 14 सप्टेंबर)रोजी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे. सामाजिक कार्यकर्ते टी.जे. अब्राहम यांनी आरोप केला आहे की येडियुरप्पा यांनी कथितपणे शेल कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक फायद्यासाठी रामलिंगम कन्स्ट्रक्शनला बीडीए गृहनिर्माण प्रकल्प प्रदान केला होता. यानंतर न्यायालयाचा निर्णय आला आहे.

हे माझ्याविरोधात रचलेलं षडयंत्र - अब्राहम यांनी येडियुरप्पा, त्यांचा मुलगा बी.वाय. विजयेंद्र, सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर आणि इतर सहा जणांविरुद्ध चौकशीची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, राज्यपालांची पूर्व संमती न घेतल्याने विशेष न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर अब्राहमने उच्च न्यायालयात अपील केले आणि विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, यावर बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, आरोपांमध्ये तथ्य नाही. तसेच, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हे माझ्याविरोधात रचलेलं षडयंत्र असल्याचेही ते म्हणाले आहेत.

राज्यपालांची पूर्व संमती न घेतल्याची याचिका फेटाळण्यात आली - सामाजिक कार्यकर्ते टीजे अब्राहम यांनी यापूर्वी येडियुरप्पा, त्यांचा मुलगा बी.वाय. विजयेंद्र, सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर आणि इतर सहा जणांविरुद्ध चौकशीची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, राज्यपालांची पूर्व संमती न घेतल्याने विशेष न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती.

Last Updated : Sep 14, 2022, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details