महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gyanvapi ASI Survey : ज्ञानवापी परिसराचे ASI सर्वेक्षण करण्याचा न्यायालयाचा आदेश - ज्ञानवापी

ज्ञानवापी शृंगारगौरी प्रकरणात न्यायालयाने परिसराच्या सर्वेक्षणासंदर्भातील याचिकेवर निकाल दिला आहे. न्यायालयाने वजू स्थळ वगळता संपूर्ण परिसराचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

Gyanvapi
ज्ञानवापी

By

Published : Jul 21, 2023, 5:25 PM IST

वाराणसी (उत्तर प्रदेश) : ज्ञानवापी शृंगारगौरी प्रकरणावर न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. या प्रकरणी न्यायालयाने शृंगार गौरी परिसराचा वजू स्थळ वगळता संपूर्ण परिसराचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. एएसआयला 4 ऑगस्टपर्यंत कोर्टात अहवाल सादर करावा लागणार आहे. न्यायालयाने या संदर्भात संबंधित सर्वेक्षण विभागाला आदेश दिले आहेत.

हिंदू पक्षाच्या वकिलांचा दावा : वाराणसी जिल्हा न्यायालयात 14 जुलै रोजी हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात ज्ञानवापी हे आदि विश्वेश्वर यांचे मूळ स्थान असल्याचे सांगत ते लाखो लोकांच्या भावनांशी निगडित मुद्दा असल्याचे म्हटले. यापूर्वीच्या आयोगाच्या कारवाई दरम्यान संकुलातील पश्चिमेकडील भिंतीवर सापडलेल्या खुणा आणि अवशेषांवरून हे संपूर्ण संकुल मंदिर पाडून बांधण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मंदिराचे अवशेष अजूनही आत आहेत जे काही गोष्टी स्पष्ट करत आहेत, त्यामुळे या संपूर्ण परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते.

दुसऱ्या पक्षाचा दावा : दुसऱ्या पक्षाने ही प्राचीन मशीद असल्याचे सांगितले होते. तसेच औरंगजेबाने हे मंदिर पाडले नव्हते, असा दावाही या पक्षाकडून करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत निर्णय दिला. वजू स्थळ वगळता शृंगारगौरी संकुलाच्या संपूर्ण परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच याचा अहवाल 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात सादर करण्यात यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

फिर्यादी पक्षाने काय मागणी केली होती, जाणून घ्या..

  • फिर्यादी पक्षाने ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करणे अपरिहार्य आहे. याच्यामुळे हिंदूंमध्ये तणावाचे वातावरण आहे, असे म्हटले होते.
  • संपूर्ण परिसराचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती.
  • फिर्यादी पक्षाने आर्कोलॉजी, रडार पेनिट्रेटिंग, एक्स - रे पद्धत, स्टायलिस्टिक डेटिंग इत्यादी पद्धतींद्वारे सर्वेक्षणाची मागणी केली आहे.

हेही वाचा :

  1. Gyanvapi Case : ज्ञानवापीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, शिवलिंगाचे वय ठरवण्यासाठी कार्बन डेटिंगवर घातली बंदी

ABOUT THE AUTHOR

...view details