महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

टूलकिट प्रकरणात दिशा रवीला अखेर जामीन मंजूर - तिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा

पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दिशाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावत जामीन मंजूर केला आहे.

court
नवी दिल्ली

By

Published : Feb 23, 2021, 5:38 PM IST

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिशाला जामीन मंजूर केला.

पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दिशाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावत जामीन मंजूर केला आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक टूलकिट स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवी हिला बंगळुरूमधून अटक केली होती. अटक केल्यानंतर दिशाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडी एका दिवसाने वाढण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी आज दिशाला पटियाला हाऊस सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी दिशाला दोन हमीदारांसह एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

ABOUT THE AUTHOR

...view details