नवी दिल्ली : आसाराम बापूची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार महिला अनुयायांनाही या प्रकरणात आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. या सर्वांची गांधीनगर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. आसारामला उद्या मंगळवार शिक्षा सुनावली जाणार आहे. (2013)मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. (2002 ते 2005)दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत म्हटले आहे.
जन्मठेपेची शिक्षा : गांधीनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आसाराम बापूला हजर करण्यात आले. या प्रकरणात आसारामवर सुरतच्या दोन मुलींनी बलात्काराचा आरोप केला होता. न्यायालयाने प्रदीर्घ सुनावणीनंतर आरोप योग्य ठरवले आणि आसारामला दोषी ठरवले आहे. तर, लहान बहिणीने आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावर बलात्काराचा आरोप केला. यामध्ये आसाराम व्यतिरिक्त त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसाराम सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. (2018)मध्ये, जोधपूर कोर्टाने त्याला (16 वर्षां)च्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. यानंतर आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
दोन बहिणींनी बलात्काराचा आरोप केला होता :सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असे मुलीने सांगितले आहे. दुसरीकडे, मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले आहे. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत.