महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Asaduddin Owaisi on Muslim Vote Bank : भारतात कधीही मुस्लिम व्होट बँक नव्हती, ती कधीच असणार नाही - असदुद्दीन ओवेसी - Muslim MLA in Gujarat

एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी  म्हणाले की जर आपण सरकार बदलू शकतो तर भारतीय संसदेत मुस्लिमांचे इतके कमी ( Asaduddin Owaisi on Gujarat election ) प्रतिनिधित्व का? त्यांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना विचारले की, गुजरात विधानसभेत मुस्लिम आमदार शेवटच्या वेळी कधी ( Muslim MLA in Gujarat ) निवडून आले होते.

असदुद्दीन ओवेसी
असदुद्दीन ओवेसी

By

Published : May 14, 2022, 5:37 PM IST

नवी दिल्ली : एआयएमआयएमचे नेते ( AIMIM chief on Muslim vote bank ) असदुद्दीन ओवसी म्हणाले की, भारतात कधीही मुस्लिम व्होट बँक नव्हती आणि कधीच असणार नाही. अहमदाबादमध्ये शनिवारी एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आतापर्यंत मुस्लिमांची फसवणूक होत आहे. मुस्लिमांनी हे मान्य केले पाहिजे की ते सत्ता बदलू शकत नाहीत. उलेमांच्या उपस्थितीत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आतापर्यंत मुस्लिमांना भावनिक गोष्टींमध्ये गुंतविले आहे.

एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी म्हणाले की जर आपण सरकार बदलू शकतो तर भारतीय संसदेत मुस्लिमांचे इतके कमी ( Asaduddin Owaisi on Gujarat election ) प्रतिनिधित्व का? त्यांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना विचारले की, गुजरात विधानसभेत मुस्लिम आमदार शेवटच्या वेळी कधी ( Muslim MLA in Gujarat ) निवडून आले होते. मुस्लिम सरकार बदलू शकतात तर बाबरी मशिदीऐवजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कशाला येईल, असे ओवेसी म्हणाले.

आम्ही एक मशीद गमावली - आता ज्ञानवापी मुद्दाऐरणीवर आला आहे. यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, वाराणसी न्यायालयाने 17 मे पूर्वी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यावर एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, आम्ही ( Owaisi Statement on gyanvapi mosque ) एक मशीद गमावली आहे. दुसरी गमावू इच्छित नाही. न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचे ते म्हणाले. ओवेसी यांनी संसदेत पास झालेल्या प्लेस ऑफ वॉरशिप अॅक्ट 1991 विरोधात न्यायालयाचा निर्णय सांगितला होता. जे खरे आहे ते खरेच राहील, असा दावा त्यांनी केला. सरकारने हा कायदा रद्द केला तर ती वेगळी बाब आहे.

दुसरी मशीद अजिबात गमावणार नाही- गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या मुद्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, बाबरी मशिदीबाबत न्यायालयाचा निर्णय आला आहे. आता ज्ञानवापीचा मुद्दा सुरू झाला आहे. मी सरकारला सांगतो की आम्ही एक बाबरी मशीद गमाविली आहे. दुसरी मशीद अजिबात गमावणार नाही.

हेही वाचा-वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा निकाल आज; काल झाली सुनावणी

हेही वाचा-Tripura CM resigns : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचा राजीनामा; 'ही' आहे भाजपची व्युहनीती

हेही वाचा-Varanasi Gyanvapi Masjid : कोर्ट कमिशनर हटविले जाणार नाही- वाराणसी दिवाणी न्यायालयाचा निकाल

ABOUT THE AUTHOR

...view details