नवी दिल्ली:माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांनी आर्थिक सुधारणांद्वारे देशाला नवी दिशा दिल्याबद्दल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी मंगळवारी देश त्यांचा ऋणी असल्याचे गौरवोद्गार काढले. मंगळवारी आयोजित TIOL पुरस्कार 2022 कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1991 साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताला एक नवी दिशा दाखवली. ( Country indebted to Manmohan Singh )
महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी पैसा उभा करण्यात मदत :उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी 'TaxIndiaOnline' पोर्टलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. मनमोहन यांच्या धोरणांमुळे नव्वदच्या दशकात महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी पैसा उभा करण्यात मदत झाल्याचा उल्लेखही गडकरींनी केला. मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ते महाराष्ट्राचे मंत्री असताना या रस्ते प्रकल्पांसाठी निधी उभारू शकले, असे ते म्हणाले.