महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hydrogen Train in India: भारतात धावणार पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे.. 'या' मार्गावर होणार पहिला प्रयोग - कालका शिमला मार्गावर हाइड्रोजन ट्रेन

भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत येणार आहे. ही ट्रेन भारतातच डिझाइन आणि तयार केली जाईल. डिसेंबरपर्यंत कालका-शिमला मार्गावर हायड्रोजन ट्रेन चालवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

INDIA'S FIRST HYDROGEN TRAIN WILL RUN ON KALKA SHIMLA ROUTE
भारतात धावणार पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे.. 'या' मार्गावर होणार पहिला प्रयोग

By

Published : Feb 3, 2023, 6:05 PM IST

शिमला (हिमाचल प्रदेश) : लवकरच हायड्रोजनवर चालणारी रेल्वे देशात रुळांवर धावणार आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या वर्षाच्या अखेरीस देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे रुळांवर धावायला सुरुवात करेल. विशेष म्हणजे ही रेल्वे पूर्णपणे स्वदेशी असेल, म्हणजेच या ट्रेनची रचना आणि निर्मिती भारतातच केली जाणार आहे. यावेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ग्रीन ग्रोथ थीमचा उल्लेख केला होता, ही हायड्रोजन रेल्वे त्याच ग्रीन ग्रोथचा एक भाग आहे.

अर्थसंकल्पावर काय म्हणाले रेल्वेमंत्री : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायड्रोजन ट्रेनबाबत पत्रकारांना सर्व माहिती दिली. ते म्हणाले की, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत धावण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे ही ट्रेन सर्वप्रथम हेरिटेज सर्किटमध्ये धावणार आहे. त्यानंतर या ट्रेनचा देशभरात विस्तार केला जाईल. त्याचे डिझाईन आणि उत्पादनही भारतातच होणार आहे.

कालका-शिमला मार्गावर हायड्रोजन ट्रेन धावेल : रेल्वेमंत्र्यांनी ज्या हेरिटेज सर्किटची चर्चा केली त्यात कालका-शिमला मार्गाचाही समावेश आहे. हा मार्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे. जागतिक वारसा असलेल्या कालका-शिमला रेल्वे विभागात हायड्रोजन ट्रेन चालवण्यासाठी कालका, शिमला आणि बरोग स्थानकांना हायड्रोजन इंधन केंद्र म्हणून विकसित केले जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. यावेळचा अर्थसंकल्प हरित विकासावर केंद्रित आहे, त्यामुळे रेल्वेलाही या दिशेने आवश्यक पावले उचलावी लागतील, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की हायड्रोजन ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत येईल आणि तिचे डिझाइन आणि उत्पादन भारतात केले जाईल. प्रथम, ते कालका-शिमला सारख्या हेरिटेज सर्किटवर रेल्वे चालवली जाईल आणि नंतर ते इतर ठिकाणी विस्तारित केले जाईल.

कालका-शिमला रेल्वे मार्ग : पर्वतांची राणी असलेल्या शिमल्यात येणाऱ्या पर्यटकांना ही नॅरोगेज रेल्वे मार्ग एक वेगळाच रोमांच देतो. या रेल्वे मार्गाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. कालका-शिमला रेल्वे मार्ग 120 वर्षे जुना आहे. कालका-शिमला रेल्वे मार्ग ९ नोव्हेंबर १९०३ रोजी सुरू झाला. हा रेल्वे मार्ग उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागांतर्गत येतो. या रेल्वे मार्गाचे बांधकाम १८९६ मध्ये सुरू झाले. 96 किमी. लांबीच्या या रेल्वे मार्गावर एकूण 18 स्थानके आहेत. कालका स्टेशन हरियाणात आहे त्यानंतर ही ट्रेन हिमाचलमध्ये प्रवेश करते. कालका-शिमला रेल्वे मार्गावरील 103 बोगद्यांमधून ही ट्रेन जाते, ज्यामुळे प्रवास खूपच रोमांचक होतो. बरोग रेल्वे स्थानकावरील बरोग बोगदा क्रमांक 33 हा सर्वात लांब असून त्याची लांबी 1143.61 मीटर आहे. कालका-शिमला रेल्वे मार्गाला नॅरोगेज लाईन म्हणतात. यामध्ये ट्रॅकची रुंदी दोन फूट सहा इंच आहे.

हेही वाचा: Railway Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद ; वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे वाढवणार

ABOUT THE AUTHOR

...view details