बंगळुरू- भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचा PSLV-C51/Amazonia-1 हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे झेपावला. आज (रविवार) सकाळी १० वाजून २४ मिनिटींनी उपग्रह सतीश धवन स्पेस सेंटरवरून अवकाशात झेपावला. ब्राझीलचा अॅमेझॉनिया हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी ब्राझीलच्या अवकाश कार्यक्रमाचे प्रमुख आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीही उपस्थित होते. उपग्रहाचे तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणही सामान्यपणे झाले.
पोलार सॅटेलाईट लाँन्च व्हेईकल श्रेणीतील इस्रोची ही ५३ वी मोहिम आहे. या मोहिमेतून अॅमेझॉनिया हा ब्राझीलचा उपग्रह अवकशात सोडण्यात आला. सोबतच इतर १८ लहान उपग्रहांचाही यात समावेश आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील स्पेस सेंटरमधून ही मोहिम राबविण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू असून तेथून प्रक्षेपणावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. ही मोहिम सकाळी साडेदहा वाजता राबविण्यात आली. मात्र, हवामानाची स्थिती पाहून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात होता. हवामान स्वच्छ असल्याने ठरवलेल्या वेळीच उड्डाण झाले.