नवी दिल्ली -कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतातील दररोजच्या कोरोना रुग्णांच्या ( India Corona New Patient ) नोंदीत कधी घट तर कधी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 166 कोरोना रुग्ण आढळले असून 302 जणांचा मृत्यू ( India Corona death ) झाला आहे. तर यात दिलासादायक बाब म्हणजे 26 हजार 988 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहिती प्रमाणे देशात सध्या 1 लाख 34 हजार 235 सक्रिय रुग्ण आहेत. भारतातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 0.31 टक्के नोंदवला गेला आहे. तर आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 46 हजार 884 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 5 लाख 13 हजार 226 लोकांचा बळी गेला आहे.