मुंबईदेशात 10 हजारांहून कमी नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात शनिवारी 9 हजार 436 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी गुरुवारी दिवसभरात 10 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. Coronavirus Cases Today मागील काही दिवस देशात 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. Covid19 याआधी 22 ऑगस्टला 10 हजारहून कमी रुग्ण आढळले होते. कालच्या तुलनेत शुक्रवारी देशात 736 कोरोना रुग्णांची घट झाली आहे.
देशात 12875 रुग्ण कोरोनामुक्तकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 12 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. Union Ministry of Health कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे, ही दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 875 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. Coronavirus Cases Today in India देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात कोरोनाचे 87 हजार 311 सक्रिय रुग्ण आहेत. देशात सध्या दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 2.50 टक्के आहे. तर आठवड्याचा रुग्ण सकारात्मकता दर 2.80 आहे. याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.62 टक्के आहे.