नवी दिल्ली -भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे वाढू लागली आहेत. देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणू (Omicron in India) ची लागण झालेल्या (Corona new variant omicron) लोकांची संख्या आतापर्यंत 4,033 झाली आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक 1,216 आणि 529 प्रकरणे आहेत. ओमायक्रॉनच्या 4,033 रुग्णांपैकी 1,552 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
मंत्रालयाने सकाळी 8 वाजता प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,79,723 नवीन प्रकरणे (new cases of Corona) नोंदली गेली आहेत. गेल्या 225 दिवसांत सर्वाधिक कोरोना केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. देशात 3,57,07,727 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर कोरोना संसर्गामुळे 146 लोकांचा मृत्यू झाला. तर एकूण मृत्यूंची संख्या 4,83,936 वर पोहोचली आहे.