नवी दिल्ली - आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. देशात गेल्या 24 तासांत नवे 45,951 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 817 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 60,729 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाख इतकी आहे. देशाचा रिकव्हरी रेट 96.92 टक्क्यांवर आला आहे.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- एकूण रुग्ण : 3,03,62,848
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,94,27,330
- सक्रिय रुग्ण संख्या : 5,37,064
- एकूण मृत्यू : 3,98,454
- एकूण लसीकरण : 33,28,54,527
गेल्या 24 तासांत 19,60,757 चाचण्या पार पडल्या आहेत. आतापर्यंत कोरोना चाचण्यांनी देशात 40 कोटी 81 लाखांचा आकडा गाठला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 1.31 टक्क्यांवर पोहोचला असून रिकव्हरी रेट 96 टक्क्यांहून जास्त आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचं प्रमाण 1.77 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे.
महाराष्ट्रातील स्थिती...
महाराष्ट्रात सध्या 1,20,281 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 1,21,804 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आढळून आले. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जवळपास 3,400-4,000 नमुन्यांची तपासणी कऱण्यात आली आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. त्यानंतरदेखील त्याला डेल्टा प्लसचे संक्रमण झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात सतर्क राहण्याचे सूचित केले आहे. ज्याप्रमाणे कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यासाठी राज्यसरकार पूर्णपणे सतर्क आहे. राज्यातील ऑक्सिजन क्षमतेमध्ये वाढ करण्यात येत आहे, नवीन कोरोना रुग्णालये उभारली जात आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
लसीकरणात भारताने अमेरिकेला टाकले मागे -
कोरोना विरोधी लढाईत भारताने आघाडी घेतली आहे. एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. सर्वांत जास्त लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेला भारताला मागे टाकले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढ लक्षात घेता लसीकरणाच्या प्रक्रिया देखील वेगात सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. आतापर्यंत भारतात कोविड लसीचे 32,36,63,297 डोस दिले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोरोना लसीचे 32,33,27,328 डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा -#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
हेही वाचा -MAHARASHTRA BREAKING : राज्यात डेल्टा प्लसचे २० रुग्ण; कोरोना लस घेतल्यानंतरही एकाला लागण- राजेश टोपे