नवी दिल्ली :देशात गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार ८३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, कोरोनामुळे याच कालावधीमध्ये ३ हजार ३०३ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ९४ लाख, ३९ हजार ९८९ झाली आहे. तर, एकूण बळींची संख्या ३ लाख, ७० हजार, ३८४ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये १ लाख, ३२ हजार ६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० लाख, २६ हजार १५९ झाली आहे. देशातील सद्याचा पॉझिटिव्हिटी दर ४.२५ टक्के आहे.