नवी दिल्ली Corona Virus Update : देशभरात एकाच दिवसात कोरोनाची ५२९ नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत. यासह आता सक्रिय संक्रमणांची संख्या ४,०९३ एवढी झाली. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २४ तासांच्या कालावधीत कोरोनामुळे तीन जणांचे मृत्यू झाले. यापैकी दोन कर्नाटकातील आणि एक गुजरातमधील आहे. ५ डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांपर्यंत घसरली होती. परंतु नवीन j1 व्हॅरियंट उदयास आल्यानंतर आणि थंडीत वाढ झाल्यानंतर संक्रमण पुन्हा वाढलं आहे.
पाच राज्यांमध्ये ९० टक्के केसेस : संपूर्ण भारतात कोविड - १९ प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. ओडिशात गेल्या २४ तासांत दोन नवीन कोविड प्रकरणं नोंदवली गेली. यासह राज्यात डिसेंबरमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या पाच झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं बुधवारी ही माहिती दिली. ओडिशात नोव्हेंबरमध्ये ११ प्रकरणं नोंदवली गेली होती. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा या पाच राज्यांमध्ये कोरोनाचा वेगानं प्रसार होत असून, देशातील एकूण केसेस पैकी ९० टक्क्यांहून अधिक केसेस या राज्यांतील आहेत.