महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कोरोनावरील लस सुरक्षितच, संकोच बागळू नका' - कोरोना लस घेण्यास नकार बातमी

लस सुरक्षित नसल्याची भावना मनात असल्याने काही जण नकार देत आहेत. मात्र, लस पूर्णत: सुरक्षित असून संकोच बाळगू नका, असे आवाहन आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.

हर्षवर्धन
हर्षवर्धन

By

Published : Jan 21, 2021, 1:26 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येत आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी लस घेण्याचे टाळले आहे. लस सुरक्षित नसल्याची भावना मनात असल्याने काही जण नकार देत आहेत. मात्र, लस पूर्णत: सुरक्षित असून संकोच बाळगू नका, असे आवाहन आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.

कोरोनावर लस हाच पर्याय -

कोरोना लस परिणामकारण आणि सुरक्षित आहे. लसीचे काही दुष्पपरिणाम आणि प्रतिकूल परिणाम सामान्य आहेत. कोणतीही लस घेतल्यानंतर ही साधारण लक्षणे दिसून येतात. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. काही जण राजकीय फायद्यासाठी लसीबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे काही व्यक्तींच्या मनात लसीबाबत संकोच निर्माण आहे.

दोन कंपन्यांच्या लसींना आणीबाणीच्या वापराचा परवाना -

भारतामध्ये १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सीरम कंपनीची कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीला आणीबाणीच्या काळात वापरासाठी परवाना देण्यात आला आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर काही व्यक्तींमध्ये दुष्परिणाम दिसून आले आहेत. तर दोन व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. मात्र, हे मृत्यू लसीकरणाशी संबधित नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारत बायोटेक कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल आले नसल्यानेही अनेकांनी लस घेण्यास नकार दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details