हरिद्वार (उत्तराखंड) -पतंजली योगपीठ हरिद्वार येथे सुरू असलेल्या औषधी वनस्पती ( Corona vaccine is a failure says Baba Ramdev ) संबंधी कार्यक्रमात योगगुरू बाबा रामदेव ( Baba Ramdev on medical science ) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा हवाला देत बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वैद्यकीय विज्ञानावर निशाणा साधला आहे. बाबा रामदेव यांनी कोरोना लस हे वैद्यकीय शास्त्राचे अपयश असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा -Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे सिरसिल्लामध्ये राष्ट्रध्वज बनवण्याचे काम जोरात सुरू
बुस्टर डोस घेऊनही बिडेन यांना कोरोना - बाबा रामदेव म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आणि बूस्टर डोस देखील घेतला, तरी देखील त्यांना कोरोना झाला. वैद्यकीय शास्त्राचे अपयश दिसून येत आहे, असे स्वामी रामदेव म्हणाले. तसेच, जग पुन्हा औषधी वनस्पतींकडे परत येईल, अशी आशा बाबा रामदेव यांनी व्यक्त केली.
..तर भारत मोठी अर्थव्यवस्था बनेल - पतंजलीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या तिसऱ्या दिवशी बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं आहे. रामदेव म्हणाले की, करोडो लोकांनी तुळशी, कोरफड आणि गिलॉय यांना त्यांच्या घरातील बागेत स्थान दिले आहे, ज्यामुळे त्यांना आरोग्य आणि समृद्धी मिळत आहे. जग औषधी वनस्पतींकडे परत येईल. गिलॉयवर संशोधन करून औषधे बनवल्यास भारत जगातील एक मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.
हेही वाचा -Rahul gandhi on PM Modi : मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही, जे करायचे आहे ते करा - राहुल गांधी