मुंबईत आज 521 रुग्णांची नोंद झाली असून ही गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आज मृतांच्या आकडेवारीतही घट झाली आहे. आज 7 मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 720 दिवसांवर पोहचला आहे.
#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - mumbai corona
20:28 June 21
चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद.. 521 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू
17:08 June 21
मुंबईत स्वाईन फ्लूचे दोनच रुग्ण, दोन्ही रुग्ण बरे
मुंबईत स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 5 रुग्ण आढळून आले होते. यावर्षी मार्च मध्ये एक तर जून महिन्यात एक असे दोनच रुग्ण आढळून आले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी ५०% पेक्षा कमी केसेस समोर आल्या आहेत. स्वाईन फ्लू फैलावू नये म्हणून आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
17:08 June 21
डेल्टा प्लसचा एकही रुग्ण मुंबईत नाही, मात्र बाजूच्या शहरात असण्याची शक्यता
मुंबईत डेल्टा प्लसचा एकही रुग्ण मुंबईत नाही, मात्र मुंबई बाजूच्या शहरात या व्हेरिएंटचा रुग्ण असण्याची शक्यता आहे.
17:08 June 21
मुंबईत लसीपुरवठा चांगला.. या महिन्यात ६ लाखाहून अधिक लसींची पुरवठा
मुंबई - गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला असून जून महिन्यात जवळपास ६ लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे. प्रत्येक सेंटरवर ३०० लसी दिल्या जाता आहेत. .मुंबईत गर्दीचे नियोजन करता यावे याकरता १८ ते ४४ वयोगटामध्ये दोन उपगट करण्यात आलेत. यापैकी राज्याच्या संमतीने ३० ते ४४ च्या वयोगटाचे लसीकरण सुरु झालंय.. मुंबईत १८ ते ४४ वयोगटात ५० लाख लोकसंख्या आहे. पुढचा एक आठवडा २ उपगटांनुसार लसीकरण प्रक्रियेचा अभ्यास केला जाणार. आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त लस साठा. ७५% लससाठ्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. राज्याकडून मुंबई महापालिकेला लस साठा मिळतो. लससाठा वाढल्यास अधिक लसकेंद्र सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली.
15:05 June 21
कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणार - आयआयटी कानपूर
नवी दिल्ली -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून गेलेल्या भारतीयांकरिता चिंताजनक बातमी आहे. आयआयटी कानपूरच्या अभ्यासानुसार कोरोनाची तिसरी तीव्र लाट चालू वर्षात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तविली आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याबाबत राज्य व केंद्र सरकारचे एकमत झाले आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक राजेश रंजन आणि महेंद्र वर्मा आणि त्यांच्या टीमने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. आयआयटीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निकष पाहून एसआआयआर मॉडेलचा वापर केला आहे. या मॉडेलनुसार तिसरी तीव्र लाट ही सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येणार आहे. मात्र, ही तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल.
13:24 June 21
गर्दी भोवली : राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक
पुणे - कोरोनाच्या नियमांचा भंग करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात गर्दी जमवल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी केली.
09:35 June 21
मुंबईत आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात
मुंबई- मुंबईत आजपासून राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी महापालिकेची लसीकरण केंद्र सज्ज झाली आहेत. ५० टक्के नोंदणी तसेच ५० टक्के वॉकइन पद्धतीने येणाऱ्यांचे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे महापालिका, सरकारी रुग्णालयात हे लसीकरण मोफत केले जाणार आहे.
06:36 June 21
देशात आढळले गेल्या ८८ दिवसांतील सर्वात कमी रुग्ण, मृतांची संख्याही घटली
देशात गेल्या चोवीस तासांत 53 हजार 256 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही गेल्या 88 दिवसातील सर्वांत कमी आकडेवारी आहे. शिवाय रविवारी 78 हजार 190 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1 हजार 422 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. या नवीन रुग्णसंख्येसह देशातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 2 कोटी 99 लाख 35 हजार 221 झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 88 लाख 44 हजार 199 जण बरे झाले आहेत. एकूण मृतांची संख्या 3 लाख 88 हजार 135 वर पोहोचली आहे. देशात सध्या 7 लाख 2 हजार 887 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत 28 कोटी 36 हजार 898 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
06:35 June 21
मुंबईत आज 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 19 रुग्णांचा मृत्यू
मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गुरुवारी 666, शुक्रवारी 762, शनिवारी 696, तर रविवारी 733 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीवरून मुंबईत रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून 650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 726 दिवसांवर पोहचला आहे.
06:35 June 21
राज्यात रविवारी 9361 कोरोना रुग्णांची भर; तर 190 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज राज्यात नव्या 9361 कोरोना रुग्णांची भर पडली असून 190 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 9101 जणांना रुग्णालयातून डिस्रार्च देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 1,32,241 सक्रिय रुग्ण असून 57,19,457 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.76 टक्के एवढा आहे.
06:16 June 21
उपराजधानीत कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद नाही, १३४ जण कोरोनामुक्त
नागपूर - जिल्ह्यात सातत्याने तिसऱ्या दिवशी शहरात तर ग्रामीण भागात मागील सात दिवसात एकही मृत्यूची नोंद नाही. उपराजधानी मेडिकल हब असल्याने यासोबत मोठ्या प्रमाणात रुग्ण बाहेर जिल्ह्यातून किंवा लगतच्या राज्यातून येतात. यात एकही रुग्ण मागील 24 तासात दाखल झाला नाही. यासोबत मृत्यूही नसल्याने शहर ग्रामीण आणि बाहेर जिल्ह्याच्या तिन्ही रकान्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच झालेली ही नोंद आणि रुग्णसंख्या हजारच्या आत आल्याने आनंददायी क्षण आहे.