Health Minister Mandaviya : कोरोना मुळे महाराष्ट्रात 67 डाॅक्टर 19 परिचारिकांचा बळी - Corona kills 67 doctors and 19 nurses in Maharashtra
कोरोना मुळ महाराष्ट्रात 67 डाॅक्टर 19 परिचारिकांचा बळी गेला (Corona kills 67 doctors and 19 nurses in Maharashtra), तर गुजरात मध्ये 20 डाॅक्टर 20 परिचारिकांचा बळी गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya ) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया
दिल्ली: कोरोनाने आतापर्यंत महाराष्ट्रात 67 डॉक्टर, 19 परिचारिकांचा बळी घेतला आहे. तर गुजरातमध्ये 20 डॉक्टर, 20 परिचारिका, 6 रुग्णवाहिका चालक आणि 128 पॅरामेडिक्सचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. 15 ते 18 वयोगटातील 5 कोटींहून अधिक तरुणांना आत्तापर्यंत कोविड लसीचा पहिला डोस मिळाला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 8, 2022, 4:47 PM IST
TAGGED:
Health Minister Mandaviya