नवी दिल्ली/मुंबई- गेल्या 24 तासांत कोरोनाची 13,313 नवीन रुग्ण आढळले आहेत. 10,972 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर 38 कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. देशात 83,990 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पॉझिटिव्हटी दर 2.03 टक्के आहे.
देशात 83,990 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पॉझिटिव्हटी दर 2.03 टक्के आहे.
देशात एका दिवसात बुधवारच्या आकडेवारीप्रमाणे कोविड-19 चे 12,249 नवीन रुग्ण ( India corona update ) आढळले आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4,33,31,645 झाली आहे, तर मृतांची संख्या 5,24,903 झाली आहे. आणखी 13 रुग्णांचा मृत्यू झाला ( India corona death ) आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,300 ने वाढल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या 81,687 झाली आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उपचाराधीन प्रकरणे संसर्गाच्या ( corona cases in India ) एकूण प्रकरणांपैकी 0.19 टक्के आहेत. कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.60 टक्के आहे. आतापर्यंत 4,27,25,055 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे. देशव्यापी अँटी-कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 196.45 कोटी डोस लोकांना देण्यात आले आहेत. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली.
19 डिसेंबर 2020 रोजी देशात या प्रकरणांची संख्या एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी, 4 मे रोजी, बाधितांची संख्या 20 दशलक्ष आणि 23 जून 2021 रोजी ती 30 दशलक्ष पार केली होती. यावर्षी २६ जानेवारीला प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती.
ही आहे कारणे -पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणत नागरिक हे बाधित होत होते. नागरिकांच्या मनात भीती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणत पाहिलं लसीकरण डोस घेण्यात आल. त्यानंतर ही काही नागरिकांकडून तसेच शासनाच्या आवहानानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक पुढे आले. पण त्याच वेळी तिसरी लाट ओसरली आणि निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळे ज्या प्रमाणात दुसऱ्या डोससाठी आणि बूस्टर डोससाठी नागरिक पुढे यायला पाहिजे होत, तेवढ्या प्रमाणत नागरिक पुढे आलेले नाही. तसेच जी काळजी पूर्वी नागरिकांकडून घेतली जात होती. तशी काळजीदेखील नागरिकांकडून घेतली जात नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा प्रसार वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे डॉ.उदय भुजबळ यांनी दिली आहे.
जवळजवळ 99 टक्क्याहून अधिक रुग्ण हे असिमटेमिक -सध्या जे नवीन व्हेरीयंटचे नवीन रुग्ण सापडत आहे. त्या रुग्णांना एक ते दोन दिवस ताप येणे, अंग दुखी, सर्दी, खोकला, अशी लक्षणे दिसून येत आहे. तर यात विशेष म्हणजे कोणीही जास्त प्रमाणत सिरयस झालेलं नाही. कोणालाही ऑक्सिजनची गरज लागणे, व्हेंटिलेटरची गरज लागणे अशी परिस्थीती निर्माण झालेली नाही. जवळजवळ 99 टक्के हून अधिक रुग्ण हे असिमटेमिक आहे. आणि ते रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहे. परंतु यात ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे.ज्यांना आजार जास्त आहे.अश्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. असं देखील यावेळी डॉ उदय भुजबळ यांनी सांगितले.