महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Corona Update : दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट ; सलग दुसऱ्या दिवशी एकाचा मृत्यू - Coronavirus update

चीनमध्ये कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती पाहता देशात अलर्ट जारी करण्यात आला (corona cases double in Delhi) आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील आणि दिल्लीतील कोरोनाच्या ताज्या परिस्थितीवर स्वतंत्र बैठका (Coronavirus update) घेतल्या. गुरुवारी कोरोनाच्या ताज्या आकडेवारीत दिल्लीत कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू (Corona Delhi update today) झाला.

Corona Update
कोरोना रुग्णांची संख्या

By

Published : Dec 23, 2022, 8:08 AM IST

नवी दिल्ली :जागतिक महामारी कोरोनाबाबत दिल्लीतील आकडेवारी चिंताजनक (corona cases double in Delhi) आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे दुप्पट रुग्ण आढळले आहेत. दिल्ली सरकारने बुधवारी जारी केलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये कोरोनाचे एकूण 5 रूग्णांची नोंद केली गेली. त्यात एका रुग्णाच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आला.

एका रुग्णाचा मृत्यू : गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 आहे. दुसऱ्या दिवशीही एका रुग्णाचा मृत्यू झाला (Delhi One death) आहे. तथापि, संसर्ग दर 0.41 टक्के नोंदवला गेला आहे. 24 तासांत 2421 कोरोना चाचण्या (Corona Delhi update today) झाल्या.

कोरोना रुग्णांची संख्या

होम आयसोलेशन :सध्या दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या ३२ आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, सध्या राजधानी दिल्लीत होम आयसोलेशनमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे. त्याचवेळी रुग्णालयांमध्ये 4 रुग्ण दाखल आहेत. परंतु अजून दिल्लीत कोणतेही निर्बंध लागू (Coronavirus update) नाहीत.

चाचणी अनिवार्य : केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणांनी येणार्‍या काही प्रवाशांची 24 डिसेंबरपासून कोरोनाव्हायरस चाचणी केली जाईल. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरी उड्डाण मंत्रालयाला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. प्रत्येक फ्लाइटमधील एकूण प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची आगमनानंतर विमानतळावर चाचणी केली जाईल, असे अधिकृत पत्रात म्हटले (Corona case update) आहे.

आढावा बैठक : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. यानंतर म्हटल्यावर कोविडचे नवीन प्रकाराचा एकही रूग्ण अद्याप सापडलेला नाही, परंतु आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. घाबरण्याची गरज (Corona Update) नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details