महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Coromandel Express Accident : ओडिशात भीषण रेल्वे अपघात किमान २३३ ठार; कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडीच्या धडकेने कोरोमंडल एक्सप्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या आहेत. या अपघातात जवळपास २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच 180 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे.

Coromandel Express Derailed
Coromandel Express Derailed

By

Published : Jun 2, 2023, 8:36 PM IST

Updated : Jun 3, 2023, 6:13 AM IST

कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

बालासोर(ओडिशा) : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेनला अपघात झाला आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालगाडीने धडक दिल्याने ट्रेनच्या चार बोगी रुळावरून घसरल्याने 132 जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये हलविण्यात आले.

अनेकांचा मृत्यू : या तिहेरी रेल्वे अपघातात आतापर्यंत २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जवळपास 170 प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तीन रेल्वेंचा झालेला हा अपघात खूप भयंकर होता. या अपघातानंतर अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

अनेकांनी केला शोक व्यक्त - या तिहेरी रेल्वे अपघाताची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. तसेच या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच लगेच मदतकार्य पोहचवण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला दिले आहेत. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सध्या घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश :ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री प्रमिला मल्लिक आणि विशेष मदत आयुक्त (SRC) यांना तातडीने अपघातस्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.जिल्हाधिकारी, बालासोर यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य स्तरावरून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास SRC ची मदत घेण्यात येणार आहे.

सर्व रुग्णालये सतर्क :विशेष मदत आयुक्त (SRC) ओडिशा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हेमंत शर्मा, बलवंत सिंग, अरविंद अग्रवाल आणि DG अग्निशमन सेवा बहनगा येथे झालेल्या रेल्वे अपघातातील व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले. बालासोर आणि आसपासची वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्व रुग्णालये सतर्क ठेवण्यात आली आहेत.

मदतीची घोषणा - केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मालगाडीला कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन धडकली :बालासोर ओरिसातील बालासोरमध्ये हावडाहून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस गाडीला शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बालासोरपासून 40 किमी अंतरावर मालगाडीला कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन धडकली आहे. मालगाडीला धडक दिल्यानंतर ३ स्लीपर कोचे मोठे नुकसान झाले आहे. तर इतर डबे रुळावरून घसरले आहेत. प्राथमिक माहितीत या डब्यांची संख्या 18 असल्याचे सांगण्यात येत आहे.

18 डबे रुळावरून घसरले :या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली आहे, ज्यांना वाचवण्यासाठी स्थानिक लोक एकवटले आहेत. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते. ओडिशातील बालासोरजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रेनचे 18 डबे रुळावरून घसरले.

दोन्ही गाड्यांची धडक : या दुर्घटनेत किती नुकसान झाले याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून अनेकांचा बळी गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना कशी घडली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही, मात्र दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिग्नल बिघडल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर येऊन धडकल्याची माहिती आहे.

ट्रेनचे मोठे नुकसान : या धडकेत कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे मोठे नुकसान झाले. जवळपास संपूर्ण ट्रेन रुळावरून घसरली. यामध्ये अनेक लोक अडकले आहेत, ज्यांना स्थानिक लोक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Last Updated : Jun 3, 2023, 6:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details