मुंबई : गेमिंग अॅपद्वारे धर्मांतर केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांसोबत संयुक्त कारवाईक करत युपी पोलिसांनी बद्दो उर्फ शाहनवाजला रविवारी अटक केली. आरोपी बद्दोला गाझियाबादला येण्यात येणार आहे, ठाणे न्यायालयाने युपी पोलिसांची ट्रान्झिट रिमांड विनंती मान्य केली आहे. न्यायालायाने तीन दिवसांची म्हणजेच 15 जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांड दिला आहे. धर्मांतर प्रकरणात आरोपींची सखोल चौकशी करुन आणखी नवीन खुलासे काढून घेण्यासाठी युपी पोलिसांनी बद्दोची ट्रान्झिट रिमांड मागितली होती.
ट्रान्झिट रिमांड का : गाझियाबाद पोलीस महाराष्ट्रातील बद्दोच्या ट्रान्झिट रिमांडसाठी प्रयत्न करणार असून त्याला लवकरात लवकर गाझियाबादला नेण्यात येणार आहे. दुपारी एक वाजात बद्दोला ठाणे येथील न्यायालयात हजर केले गेले. त्यानंतर न्यायालयाने युपी पोलिसांची रिमांडची विनंती मान्य केली. गाझियाबाद पोलिसांना पुढील चौकशीसाठी बद्दोला लवकरात लवकर गाझियाबादमध्ये घेऊन जायचे आहे. आरोपीला गाझियाबादला परत आणण्यासाठी सर्व औपचारिकता पोलिसांनी पूर्ण केल्या आहेत. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर बद्दोला गाझियाबादला नेले जाईल, जेणेकरून चौकशीतून अजून त्याच्या कटकारस्थानाविषयीची नवीन माहिती समोर येईल. याप्रकरणातील आणखीन नवीन खुलासे समोर येतील.