महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Namaj Controversy : मध्य प्रदेशमध्ये वर्गात नमाज पठण करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिडीओ व्हायरल, हिंदू जागरण मंचची तक्रार

कर्नाटकातील हिजाबनंतर आता नमाजचा ( Sagar University Namaz controversy ) वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक विद्यार्थी वर्गात ( Student Reading Namaj In College ) नमाज पठण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच, हिंदू जागरण मंचने ( Hindu Jagran Manch ) या प्रकरणाची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली असून, विद्यापीठाने चौकशीचे आदेश दिले आहे.

Namaj Controversy
Namaj Controversy

By

Published : Mar 26, 2022, 3:27 PM IST

सागर ( मध्य प्रदेश ) - कर्नाटकातील हिजाबनंतर आता नमाजचा ( Sagar University Namaz controversy ) वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक विद्यार्थी वर्गात ( Student Reading Namaj In College ) नमाज पठण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या सागर येथील डॉ. हरिसिंग गौर केंद्रीय विद्यापीठातला ( Harising Gaur University ) असल्याची माहिती आहे. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल होताच, हिंदू जागरण मंचने ( Hindu Jagran Manch ) या प्रकरणाची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली असून, विद्यापीठाने चौकशीचे आदेश दिले आहे.

व्हायरल व्हिडीओ

काय प्रकरण आहे? -सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सागरच्या डॉ. हरिसिंग गौर केंद्रीय विद्यापीठाच्या शिक्षण विभागाचा आहे. येथे, नियमितपणे हिजाब परिधान करणारी दमोहची एक विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारी वर्गात नमाज अदा करत होती. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक हिंदू संघटना विरोधात उतरल्या आणि त्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिव आणि कुलगुरूंकडे तक्रार केली. विद्यार्थी बीएस्सी बीएडचे शिक्षण घेत आहे.

विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करावी - ही विद्यार्थीनी नियमितपणे हिजाब घालून विभागात येतो आणि आता तिने येथे नमाज अदा करण्यास सुरुवात केली आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जागरण मंचचे उमेश सराफ यांनी केली आहे. तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे संघटनांनी तक्रार दाखल केली आहे. व्हिडीओ तपासून आणि प्रकरणाचा अभ्यास करून प्रशासन पुढील कार्यवाही ठरवणार असल्याचे मीडिया अधिकारी विवेक जयस्वाल यांनी दिली आहे.

हेही वाचा -Kirit Somaiya in Dapoli : अनिल परब यांचे रिसोर्ट तोडण्यावरून सोमय्या आक्रमक; भाजपा कार्यकर्ते दापोलीकडे रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details