पीलीभीत - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे हिंदू रक्षा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी महामंडलेश्वर प्रबोधानंद गिरी यांनी पुन्हा एकदा विधान केले आहे. देशात मदरसा, मशीद या ठिकाणी दहशतवाद आणि जिहाद यांची शिकवण दिली जाते. मुस्लिम लोक देशाच्या दोन भागात द्वेष पसरवत आहेत. मदरसा आणि मशीद दहशतवाद निर्माण करण्याचे केंद्र मानले जाते, असे सांगत त्यांनी देसातील मुस्लिम लोकांवर टीका केली. स्वामी महामंडलेश्वर प्रबोधानंद गिरी एका दिवसाच्या दौऱ्यावर शामलीला असताना त्यांनी हे विधान केले.
कुराण आणि अल्लाह यांना मानणारे चोर
हिंदू रक्षा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी प्रबोधानंद यांनी शनिवारी पीलीभीतला भेट दिली. बिसलपूर तहसील क्षेत्रातील सरस्वती विद्या कॉलेज येथील पत्रकार परिषदेत प्रबोधानंद यांनी हे वादग्रस्त विधान केले. जिहाद्यांनी जगाला दोन भागात वाटणी केली आहे, असेही ते म्हणाले. पृथ्वीवर असे लोक आहेत जे, कुराण आणि अल्ला यांना मानतात. बाकीचे लोक मानत नाहीत. अशी मानसिकता असलेले लोक, कुराण आणि अल्लाह यांना न मानणारे मूर्ख आहेत, अशी समजूत पसरवतात. अशा लोकांना येथे राहण्याचा हक्क नाही. त्यांची हत्या केली पाहिजे.