भोपाळ : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया (Raja Pateria) यांनी पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. पटेरिया यांचा एका मेळाव्याला संबोधित करतानाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत ते काँग्रेस कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींविरोधात भडकवताना दिसत आहेत. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (FIR on Raja Pateria). तर राजा पटेरिया यांनी याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. (Raja Pateria on PM Modi)
काय म्हणाले राजा पटेरिया : व्हिडिओमध्ये राजा पटेरिया म्हणतात की, "पंतप्रधान मोदी जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. देशात दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आहे. त्यामुळे जर तुम्हाला संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा". हा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राजा पटेरियाविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, या वक्तव्याबाबत माजी मंत्री राजा पटेरिया म्हणाले की, माझ्या वक्तव्याचे चुकीचे चित्रण केले जात आहे. मी असे काहीही बोललो नाही.