हैदराबाद ( तेलंगणा ) :सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून कितीही जनजागृती केली जात असली तरी गुन्ह्यांची संख्या कमी होत नसून वाढतेच आहे. अशाच प्रकारचे दररोज दहा गुन्हे हैदराबाद शहरात दाखल होत आहेत. नुकतेच हैदराबाद शहरातील एका बांधकाम कंपनीचा ईमेल हॅक ( Construction company Mail hacked ) करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी ६४.११ लाख रुपयांची लूट ( Cyber criminals robbed 64 lakhs ) केली.
कंपनीला मिळाले आहे मोठे कंत्राट :सायबर गुन्हेगारांनी बंजारा हिल्स येथील एका बांधकाम कंपनीचा ईमेल हॅक करून ६४.११ लाख रुपये दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. कंपनी प्रतिनिधींच्या तक्रारीवरून सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यभागी कार्यरत असलेल्या एका बांधकाम कंपनीला भारतीय नौदलाकडून बाह्य बंदर बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी, बांधकाम कंपनीने दोन परदेशी कंपन्यांशी संपर्क साधून कच्च्या मालासह मुख्य संरचनांशी संबंधित तांत्रिक माहिती दिली. लंडनस्थित कंपनी त्यासाठी पुढे आली आहे. त्यांचे ईमेल संभाषण सुरू झाले आहे.