नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागाईविरोधात काँग्रेस गुरुवारी आंदोलन केले. काँग्रेसचे खासदार सकाळी विजय चौकात महागाईविरोधात आंदोलन केले. काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले. काॅंग्रेसने देशभर या आंदोलनाची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर किती वाढवायचे, लोकांचे 'खर्चे पे चर्चा' कसे थांबवायचे, तरुणांना रोजगाराची पोकळ स्वप्ने कशी दाखवायची, आज कोणत्या सरकारी कंपनीला विकायचे हे ठरवणे हेच मोदींचे राेजचे काम आहे. अशा स्वरुपाची टीका केली होती.
Protest Against Fuel Price: इंधन दरवाढीविरोधात राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांची निदर्शने - राहुल गांधींसह काँग्रेस नेते
इंधन दरवाढीविरोधात (fuel price hike) राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी (Rahul Gandhi with Congress leader ) विजय चौकात निदर्शने (protest demonstration ) केली. देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत या विरोधात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या विरोधात टीका ही केली होती.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी 100.21 रुपये डिझेल 92.27 रुपये आहे. विक्रमी १३७ दिवस स्थिर राहिल्यानंतर २२ मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर दररोज दर वाढत आहेत. गेल्या सहा महिन्यांत देशात सीएनजीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत इंद्रप्रस्थ गॅसने ३३ टक्क्यांनी, तर मुंबईत महानगर गॅसने २७ टक्क्यांनी दर वाढवले आहेत. एकट्या मार्चमध्ये अहमदाबादमध्ये 9.6 रुपये प्रति किलो आणि दिल्लीत 7 रुपयांनी भाव वाढले आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) च्या किमतीत वाढ केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये, पीएनजीचे मानक घनमीटर 1 रुपयांनी वाढले आहे, त्यानंतर पीएनजी येथे 36.61 रुपये प्रति युनिट दराने उपलब्ध होईल. नवीन किमती 24 मार्च 2022 पासून लागू झाल्या आहेत. या पार्श्वभुमीवर काॅंग्रेसने इंधन दरवाढीच्या निषेधात आंदोलन केले.