रायपूर -राजधानीतील काँग्रेस कार्यालयात अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस वर्किंग कमेटीचे सदस्य जी. संजीवा रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत, कामगार कायदा सुधारणा विधेयकांवरून केंद्र सरकारवर टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना अपत्य नाही. त्यामुळे ते कामगारांच्या दुःखाची जाणीव नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. आम्गी कामगार विरोधी धोरणांचा विरोध करत राहू, असे ते म्हणाले.
अपत्य नसल्याने मोदींना कामगारांच्या दुःखाची जाणीव नाही; काँग्रेस नेत्याची टीका - काँग्रेस वर्किंग कमेटीचे सदस्य जी. संजीवा रेड्डी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपत्य नाही. त्यामुळे त्यांना कामगारांच्या दुःखाची जाणीव नाही, असे वक्तव्य काँग्रेस वर्किंग कमेटीचे सदस्य जी. संजीवा रेड्डी यांनी केले.
केंद्र सरकारचं नवं कामगार धोरण हे कामगारविरोधी आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनानुसार कोणताही कामगार कायदा आणण्यापूर्वी कामगार संघटनांशी कायद्यांसंबधित चर्चा करणे गरजेचे आहे. चर्चा न करता केंद्राने नवा कायदा आणला आहे. या कायद्यानुसार कामगारांना संप पुकारणं कठीण आहे. नव्या कायद्यानुसार संप पुकारल्यास दोन वर्षांचा तुरूंगवास किंवा दोन लाख रुपये दंड अशी तरतूद आहे.
कामगार कायद्यानुसार किमान वेतन 50 हजार रुपये असले पाहिजे, परंतु आज 10 हजार रुपये आहे. कंत्राटी कामगारांना ठेवलं जात आहे. त्यांना कोणतीही सुविधा दिली जात नाही. देशातील सर्व सार्वजनिक उद्योग भांडवलदारांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलही महाग होत आहेत, असे रेड्डी म्हणाले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राज्यसभेत आवाजीमताने औद्यौगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यवसाय सुरक्षा संबंधित तीन कामगार विधेयकांना मंजुरी दिली होती.