नई दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या ( former prime minister rajiv gandhi ) प्रकरणातील सहा दोषींच्या मुदतपूर्व ( Rajiv Gandhi assassination case ) सुटकेविरोधात काँग्रेस लवकरच सर्वोच्च न्यायालयात नव्याने पुनर्विलोकन अर्ज दाखल करणार आहे. पक्षाच्या सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. केंद्र सरकारने या प्रकरणी आधीच पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
Rajiv Gandhi Assassination : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेविरोधात काँग्रेस पुनर्विचार याचिका दाखल करणार - Release of Nalini Sriharan
माजी पंतप्रधान राजीव गांधी ( former prime minister rajiv gandhi ) यांच्या हत्येप्रकरणी ( Rajiv Gandhi assassination case ) सहा दोषींच्या मुदतपूर्व सुटकेविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात नव्याने पुनर्विलोकन अर्ज दाखल करणार आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की,"राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणारा एक नवीन पुनर्विलोकन अर्ज लवकरच सर्वोच्च न्यायालयात दाखल केला जाईल." 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन ( Release of Nalini Sriharan ) यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले होते.
सहा आरोपींची सुटका -गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याच्या तामिळनाडू सरकारने केलेल्या शिफारशीच्या आधारे न्यायालयाने हा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर नलिनी व्यतिरिक्त आरपी रविचंद्रन, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार तुरुंगातून बाहेर आले.