नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे ( 8 Years To Modi Government ) पूर्ण होत असताना विरोधी पक्ष काँग्रेस पक्ष त्यांच्या कामगिरीचे ‘रिपोर्ट कार्ड’ जारी करणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन ( Ajay Makan ) आणि रणदीप सुरजेवाला ( Randeep Surjewala ) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी ( Narendra Modi Government ) सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करणार ( Congress To Present Report Card ) आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या कम्युनिकेशन विभागाने अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, जातीय सलोखा आणि महागाई यासारख्या विविध आघाड्यांवर मोदी सरकारच्या अपयश आणि कामगिरीवर प्रकाश टाकणारे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. "बेरोजगारी जास्त आहे आणि 45 वर्षांचा विक्रम मोडला आहे. विशेषत: जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत असताना, पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक उच्च आहेत आणि डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी आहे. परकीय गंगाजळीही घसरत आहे त्यामुळे देश आर्थिक संकटाने त्रस्त आहे. ", सूत्रांनी सांगितले.