महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 18, 2021, 8:39 PM IST

ETV Bharat / bharat

गॅस सिलिंडरची 25 रुपयांनी दरवाढ; केंद्र सरकार महिलाविरोधी असल्याची काँग्रेसची टीका

काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा म्हणाल्या, की देशातील सर्व महिलांना माझी विनंती आहे. त्यांनी बाहेर येऊन थाळ्या वाजवाव्यात. जेणेकरून महागाई आणि बेरोजगारीमुळे थाळ्या रिकाम्या असल्याचा पंतप्रधानांना संदेश मिळेल.

केंद्र सरकार महिलाविरोधी असल्याची काँग्रेसची टीका
केंद्र सरकार महिलाविरोधी असल्याची काँग्रेसची टीका

नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार हे महिला विरोधी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. गॅस सिलिंडरचे दर तातडीने मागे घ्यावेत, अशी काँग्रेसने मागणी केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर बुधवारी 25 रुपयांनी वाढले आहेत.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत पत्रकार परिषदेत म्हणाल्या, की एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढविण्याचा निर्णय म्हणजे सरकारच्या महिलांविरोधातील नीतीचे प्रतिबिंब आहे. गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने महिलांना गायीचे शेण आणि जळाऊ लाकडाकडे पुन्हा जाण्यासाठी भाग पडणार आहे. हे महिलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. देशामध्ये आर्थिक संकट व बेरोजगारी असताना सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविण्यात येत आहेत. हे सरकार कशामुळे किमती कमी करू शकत नाही?

केंद्र सरकार महिलाविरोधी असल्याची काँग्रेसची टीका

हेही वाचा-लखनौमधील हनी ट्रॅप गँगमध्ये अडकलेल्या उस्मानाबादच्या शिक्षकाची आत्महत्या; पोलिसांचा उत्तरप्रदेशात तपास सुरू

पंतप्रधान उज्जवला योजनेवर प्रश्नचिन्ह-

एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 600 रुपयांहून असू नये, अशी अपेक्षा काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत अपेक्षा यांनी व्यक्त केली. लोकांना जास्त पैसे द्यायला भाग पाडून केंद्र सरकार हे नफेखोरी आणि खंडणीचे काम करत असल्याची त्यांनी टीकाही केली. पंतप्रधान उज्जवला योजनेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ज्यांना 860 रुपयांचे गॅस सिलिंडर परवडू शकते, अशा किती लोकांना सरकारने एलपीजी कनेक्शन दिले आहे?

हेही वाचा-अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ...सीबीआयचे आरोपपत्र रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

महिलांनी घराबाहेर येऊन थाळ्या वाजवाव्यात...

काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा म्हणाल्या, की देशातील सर्व महिलांना माझी विनंती आहे. त्यांनी बाहेर येऊन थाळ्या वाजवाव्यात. जेणेकरून महागाई आणि बेरोजगारीमुळे थाळ्या रिकाम्या असल्याचा पंतप्रधानांना संदेश मिळेल. गॅस सिलिंडरचे दर तातडीने मागे घेऊन सामान्यांना त्वरित दिलासा द्यावा. सामान्यांचे घरगुती बजेट कोसळू नये, असे काँग्रेसने म्हटले आहे.

हेही वाचा-धक्कादायक! ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याचे तालिबानला समर्थन

असे आहेत गॅस सिलिंडरचे दर-

घरगुती गॅस सिलिंडरचे दर बुधवारी 25 रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीमुळे दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 860 रुपये आहे. तर कोलकात्यात 886, मुंबईत 860 तर चेन्नईत 875 रुपये गॅस सिलिंडरची किंमत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details