हैदराबाद Congress Six Guarantees Telangana :तेलंगण राज्यात समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी झटणारं काँग्रेसचं सरकार पाहणं हे माझं स्वप्न आहे, असं वक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलय. हैदराबादमधील तुक्कुगुडा येथील एका जाहीर सभेला त्यांनी संबोधित केल तेव्हा हे वक्तव्य कोलंय. तसंच तेलंगणा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचंही त्यांनी आवाहन केलंय. यावेळी त्यांनी तेलंगणा राज्यासाठी पक्षाच्या सहा सुत्री योजनांची घोषणाही केली. तसंच पक्ष सत्तेत आल्यास या योजना पुर्ण करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचही सोनिया गांधींनी म्हटलंय.
काय आहे काँग्रेसची सहा सुत्री योजना :काँग्रेसनं 'महालक्ष्मी योजना' म्हणून पहिली योजना प्रस्तावित केली असून, याअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये, 500 रुपयांना गॅस सिलिंडर आणि राज्य परिवहन महामंडळात महिलांना मोफत प्रवास देण्याचे आश्वासन दिलंय. दुसऱ्या योजनेला 'रयथू भरोसा' असं नाव दिलं असून याअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 15 हजार रुपये, शेतमजुरांना एकरी 12 हजार रुपये आणि धानासाठी 500 रुपये बोनस देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. काँग्रेसने 'गृहलक्ष्मी'च्या रुपाने तेलंगणासाठी तिसरी योजना दिलीय. याअंतर्गत त्यांनी प्रत्येक घरात २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिलंय. 'इंदिराम्मा इंदलू' नावाची चौथी योजना आहे, याअंतर्गत ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही अशा लोकांना घरं बांधण्यासाठी 5 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलंय. याअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 250 यार्डांचे घर देण्याचंही आश्वासन देण्यात आलंय. 'युवा विकास' ही काँग्रेसची पाचवी योजना आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावरील अभ्यासासाठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असं पक्षानं सांगितलंय. काँग्रेसची 'चेयुथा' (उपयुक्त) नावाची सहावी योजना आहे. या अंतर्गत वृद्धांना दरमहा ४ हजार रुपये पेन्शन आणि १० लाख रुपयांचा ‘राजीव आरोग्यश्री’ विमा देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.