रायपूर : रायपूरमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. 'अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आहेत. देशाची संपूर्ण संपत्ती एका माणसाच्या हातात जात आहे. जेव्हा आम्ही संसदेत प्रश्न विचारतो, तेव्हा माझे तसेच मल्लिकार्जुन खरगेचे भाषण हटवले जाते. मात्र, जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत आम्ही हजार वेळा प्रश्न विचारू' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
शेल कंपन्यांमध्ये कोणाचे पैसे गुंतवले?: राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करीत विचारले की, 'हजारो कोटी रुपये भारतात पाठवणाऱ्या या शेल कंपन्यात कोणाचे पैसे आहेत? अदानी समुह संरक्षण उद्योगात काम करतात पण, मोदी सरकारला हे माहित नाही. की अदानींच्या शेल म्हणजेच बनावट कंपन्या विदेशात आहेत. याचा तपास का होत नाही, जेपीसी का स्थापन होत नाही? हा देशाच्या रक्षणाचा प्रश्न आहे. असेही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस अदानी समुहाला प्रश्न विचारतच राहणार आहे. जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस मागे हटणार नसल्याचे गांधी म्हणाले.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यावर निशाणा :मोदी सरकारचे एक मंत्री म्हणाले चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा खूप मोठी आहे, मग त्यांच्याशी लढायचे कसे? इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले तेव्हा त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा लहान होती का? याचा अर्थ जो तुमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे त्याच्यापुढे आपले डोके टेकवणार का अशी टीका त्यांनी जयशंकर यांच्यावर केली.
अदानींच्या संपत्तीत मोदींमुळे वाढ : 'शेतकरी दररोज 27 रुपये कमवत आहे. मात्र, पंतप्रधानांचे मित्र 1600 कोटी कमवत आहेत आज भारतात कोणाला संधी मिळत आहे'. राज्याच्या धोरण तुम्हाला वाचवत नसेल तर, केंद्राची धोरणे तुमचा विनाश करतील. असा हल्ला प्रियंका गांधी यांनी मोदीवर केला आहे. देशातील शेतकरी दररोज 27 रुपये कमवत आहे. पंतप्रधानांचा मित्र रोज 1600 कोटी कमावतो. देशातील करोडो तरुण बेरोजगार आहेत. कोळसा, रस्ते, सार्वजनिक उपक्रम आणि विमानतळ हे सर्व पंतप्रधानांचे मित्र असलेल्या अदानी यांना दिले आहेत. 3 वर्षात अदानीची संपत्ती अनेक पटींनी वाढली आहे. अदानी यांना बँकांकडून 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे याला भाजप जबाबदार असल्याचे ते प्रियंका गांधी म्हणाल्या.
मित्र का साथ मित्र का विकास : सबका साथ सबका विकास नाही, तर मित्र का साथ मित्र का विकास करता आहेत. पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत, लोकसभा सदस्य सर्वच अदानी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. या देशात गरिबांचे ऐकले जात नाही. काही निवडक उद्योगपतींचेच ऐकले जात आहे. प्रियांका गांधींनी जनतेला आवाहन केले आहे की, तुम्ही हे सत्य ओळखले पाहिजे. सबका साथ आणि सबका विकास हा नारा आता मित्राचा विकास झाला असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या.
अदानी संपत्तीत वाढ :मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "केंद्र सरकार लोकशाही विरोधी आहे. हे सरकार लोकांसाठी काम करणारे सरकार नाही. हे फक्त हुकूमशाही चालवणारे सरकार आहे. सरकारने दलित, गरिबांचे रक्षण करायला हवे. वंचितांना, आज बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. आम्ही तुमचा संसदेत आवाज उठवला. आम्ही अदानीच्या संपत्तीचा हिशेब मागितला. अडीच वर्षात अदानीची संपत्ती अनेक पटींनी वाढली. तुम्ही अदानींना शिकवलेला मंत्र सांगा. एक रुपया अडीच वर्ष तेरा रुपये कसा होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्ही एका अदानीसाठी संपूर्ण भारत उद्धवस्त करणार का असा प्रश्न देखील त्यांनी मोंदीना विचारला.