नवी दिल्ली श्रीनगर : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला Ghulam Nabi Azad resigns आहे. काँग्रेस महागाई, बेरोजगारी आणि ध्रुवीकरणाविरुद्ध लढा देत असताना हा राजीनामा देणे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याचे काँग्रेसने शुक्रवारी म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, राजीनामा पत्रात नमूद केलेल्या गोष्टींमध्ये तथ्य नसून त्यांची वेळही योग्य नाही. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले की, काँग्रेस जेव्हा महागाई, बेरोजगारी आणि ध्रुवीकरणाविरोधात लढा देत आहे, त्यावेळी हा राजीनामा आला आहे, हे अत्यंत दुःखद आहे.
माकन म्हणाले की, आझाद यांच्यासारखे ज्येष्ठ नेते विरोधकांच्या आणि जनतेच्या आवाजाला बळ देतील, अशी आम्हाला अपेक्षा होती, मात्र त्यांनी तसे केले नाही. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून दिलेला राजीनामा हा पक्षासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. अशा जुन्या पक्षाची पडझड पाहणे दुःखदायक आणि भयानक आहे. अनेक दिवसांपासून अशी अटकळ होती, असे ट्विट त्यांनी केले. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. अलीकडच्या काळात पक्ष सोडणारे ते सर्वात ज्येष्ठ नेते Ghulam Nabi Azad quit Congress आहेत, त्यांचा राजीनामा अत्यंत दुःखद आहे. ओमर म्हणाले की, एवढ्या जुन्या पक्षाची पडझड पाहणे दु:खद आणि भयानक आहे.