नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा आहे. ही विदारक परिस्थिती कोरोनाचे अनियंत्रित चित्र दर्शवत आहे. या भयान परिस्थीतीवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी टि्वट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
सकारात्मकता हा एक पंतप्रधानांचा पीआर स्टंट आहे. पंतप्रधानांच्या धोरणांमुळे झालेल्या कोरोना मृत्यूची खरी आकडेवारी लपविण्यासाठी हा करण्यात आला आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच सोशल मीडिया आणि आपली खोटी प्रतिमा ही सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, वाढती महागाई आणि कोरोना लस नागरिकांची प्राथमिकता आहे. हे कसले चांगले दिवस, असेही टि्वट राहुल गांधींनी केले होते.